लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ग्लोबल पॅगोडा येथे मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात. मात्र, काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, खबरदारीची उपाययोजना म्हणून ५ ते ७ डिसेंबर दरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्यात येणार आहे.