Join us
Daily Top 2Weekly Top 5

पान २ स्ट्रीप - थोडक्यात...

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST


पान २ स्ट्रीप - फोटो मेल करत आहे....
स्पीडब्रेकरची दुरवस्था
मुंबई: दादर पूर्वच्या हिंदू कॉलनी रस्त्यावरील स्पीडब्रेकरची दुरवस्था झालेली आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या स्पीडब्रेकर उंच सखल आहे. स्पीडब्रेकरची खडी निघून गेल्याने मध्येच खड्डे पडले आहेत. या स्पीडब्रेकरवर झेब्रा क्रॉस काढण्यात आले होते, पण तेही पुसट झाले आहेत. या रस्त्यावर रहदारी असते, या स्पीडब्रेकरमुळे अनेक चालकांना त्रास होतो.
........................
थोडक्यात
फलाटाची उंची कमी
मुंबई: परेच्या दादर स्थानकावरील पहिल्या फलाटाची उंची खूपच कमी आहे. यामुळे रेल्वेत चढताना, उतरताना अनेक महिला, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. रेल्वे आणि फलाटामधील अंतर खूप असल्याने गर्दीच्यावेळी उतरताना-चढताना अनेकांच्या पायाला लागते.
.............................
वाडिया रुग्णालयाला पुरस्कार
मुंबई: वाडिया रुग्णालयाला एआयईएससी संस्थेकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. एआयईएसएसीच्या १३ व्या परिषदेत वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांना हेल्थ केअर क्षेत्रातील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
............................