पान २ किंवा ३....डिंपल यांची सुनावणी १० मार्चला
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
(डिंपल आणि अनिता अडवाणी यांचे फोटो वापरावेत)
पान २ किंवा ३....डिंपल यांची सुनावणी १० मार्चला
(डिंपल आणि अनिता अडवाणी यांचे फोटो वापरावेत)(राज्यालाही पाठवावी).......................डिंपल यांची सुनावणी १० मार्चलामुंबई : दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांची एकमेव कायदेशीर पत्नी असल्याने त्यांच्या मालमत्तेवर केवळ माझाच अधिकार असल्याचा दावा करणार्या अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्या याचिकेवर येत्या १० मार्चला सुनावणी होणार आहे.खन्ना यांच्या निधनानंतर अनिता अडवाणी यांनी कौटुंबिक न्यायालयात धाव घेऊन त्यांच्या मालमत्तेवर दावा केला़ तसेच खन्ना यांच्या अखेरच्या दिवसांत मी त्यांच्यासोबत आशीर्वाद बंगल्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती़ ते आजाराने अधिकच ग्रस्त झाल्यानंतर डिंपल, अभिनेत्री टिष्ट्वंकल खन्ना व अभिनेता अक्षय कुमारने मला घराबाहेर काढले़ त्यामुळे त्यांच्या मालमत्तेची वाटणी मिळावी व मला घराबाहेर काढणार्यांनाविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा खटला चालवावा, अशी मागणी अडवाणी यांनी याचिकेत केली़त्याची दखल घेत वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने डिंपल, अक्षय व टिष्ट्वंकल यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स जारी केले़ त्यानंतर तत्काळ डिंपल यांनी ही याचिका केली़ (प्रतिनिधी)