पान २...सिंचन घोटाळा महत्त्वाची बातमी.....
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
(राज्यालाही पाठवावी)
पान २...सिंचन घोटाळा महत्त्वाची बातमी.....
(राज्यालाही पाठवावी)..................................सिंचन घोटाळाएसीबीची खुली चौकशी समाधानकारक -हायकोर्टमुंबई : राज्यातील १२ सिंचन प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असलेल्या खुल्या चौकशीची व्याप्ती समाधानकार असल्याचे मत व्यक्त करत या चौकशीत तूर्तास तरी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसल्याचे निरीक्षण मंगळवारी उच्च न्यायालयाने व्यक्त केले़सिचंन घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मयांक गांधी व इतरांनी दाखल केली आहे़ याचे प्रत्युत्तर सादर करताना मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून १२ सिंचन प्रकल्पांची एसीबीकडून खुली चौकशी होणार असल्याचे न्यायालयात स्पष्ट केले़ मात्र या चौकशीची व्याप्ती किती असणार आहे? याचा खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने एसीबीला दिले होते़ त्यानुसार एसीबीने मंगळवारी याचा पाकिट बंद अहवाल सादर केला़ हा अहवाल वाचल्यानंतर न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने यावर समाधान व्यक्त केले़मात्र कोंढाणे व काळू प्रकल्पांसाठी केंद्र सरकार व इतर विभागांकडून लागणार्या आवश्यक परवानग्या घेण्यासाठी निधी वितरीत केला जाणार आहे की नाही? याचेही स्पष्टीकरण देण्याचे आदेश न्यायालयाने राज्य शासनाला दिले व ही सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली़ (प्रतिनिधी) ..........................