Join us

पान २....तरुणीच्या बलात्कार प्रकरणी अभियंता अटकेत

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

बलात्कार प्रकरणी अभियंता अटकेत

बलात्कार प्रकरणी अभियंता अटकेत
मुंबई: लग्नाचे अमीष दाखवून २५ वर्षीय कॉलेज तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये शनिवारी समोर आली. याप्रकरणी सतेंद्र बलदेव मिश्रा (२७) या अभियंत्याला भांडुप पोलिसांनी अटक केली आहे.
भांडुपच्या फरिद नगरमध्ये तक्रारदार तरुणी आई वडिलांसोबत राहण्यास आहे. २०१३ मध्ये तिची मिश्रा सोबत ओळख झाली. लग्नाचे अमीष दाखवून मिश्राने माथेरान येथील मंदिरात नेऊन तरुणीशी विवाहाचे सोंग रचले. माथेरानमध्ये नेऊन तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. मिश्राने फसवणूक करुन गावी जाऊन लग्न केल्याची माहिती शनिवारी या तरुणीला मिळाली. तिने तत्काळ भांडुप पोलीस ठाणे गाठून या संदर्भात तक्रार दाखल केली.
तरुणीच्या तक्रारीवरुन भांडुप पोलिसांनी रात्री उशीरा मिश्राच्या मुसक्या आवळल्या. मिश्रा हा एका नामांकित कंपनीत अभियंता म्हणून कामाला असून भांडुप हनुमान नगर येथे राहण्यास आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. (प्रतिनिधी)