Join us

‘पद्मदुर्ग’च्या स्वच्छता मोहिमेत सापडली तोफ!

By admin | Updated: December 19, 2014 22:53 IST

महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील ९ जलदुर्गांपैकी पाच जलदुर्ग शिवाजी महाराजांनी बांधले. या सर्व किल्ल्यांमध्ये दुर्लक्षित राहिलेला जलदुर्ग म्हणजे पद्मदुर्ग ऊर्फ कासा किल्ला होय.

मुरुड : महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील ९ जलदुर्गांपैकी पाच जलदुर्ग शिवाजी महाराजांनी बांधले. या सर्व किल्ल्यांमध्ये दुर्लक्षित राहिलेला जलदुर्ग म्हणजे पद्मदुर्ग ऊर्फ कासा किल्ला होय. येथे नुकतीच साफसफाई मोहीम राबविण्यात आली. यावेळी ३ फूट लांबीची छोटेखानी तोफ सापडली. पूर्वी किल्ल्यात ४० तोफा होत्या. आता या तोफांची संख्या ४१ वर पोहोचली. मुख्य दरवाजातून प्रथम बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्यानंतर पडकोटात. पडकोटासह किल्ल्यात भग्न अवशेषांसह ४० तोफा होत्या. पुरातत्व खात्याच्या स्वच्छता मोहिमेत मुंबईच्या दुर्गवीर संस्थेच्या सदस्यांनी पद्मदुर्ग किल्ल्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होवून परिसर सफाईसाठी सहकार्य केले. चुना भिजविण्यासाठी केलेल्या खड्ड्यात पुरातत्व खात्याचे अधिकारी विजय चव्हाण यांना नुकतीच ३ फूट लांबीची ७० ते ८० किलो वजनाची तोफ सापडली. चव्हाण यांना १७ नोव्हेंबर २०१२ रोजी खाणकामात २५० तोफगोळेही सापडले होते. (वार्ताहर)