Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत खड्ड्यांचा पाऊस

By admin | Updated: July 15, 2014 00:58 IST

दर्जेदार रस्त्यांसाठी मागच्या वर्षी पालिकेने मास्टर प्लॅन तयार केला़ पाच वर्षांमध्ये रस्ते चकाचक होतील, अशी घोषणाबाजी करण्यात आली़ परंतु या योजनेच्या पहिल्याच वर्षात रस्ते खड्ड्यात गेले आहेत.

शेफाली परब-पंडित, मुंबईदर्जेदार रस्त्यांसाठी मागच्या वर्षी पालिकेने मास्टर प्लॅन तयार केला़ पाच वर्षांमध्ये रस्ते चकाचक होतील, अशी घोषणाबाजी करण्यात आली़ परंतु या योजनेच्या पहिल्याच वर्षात रस्ते खड्ड्यात गेले आहेत. गेले काही दिवस हजेरी लावणाऱ्या पावसाने रस्त्यांची चाळण केली आहे़ त्यामुळे महिन्याभरातच पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर दोन हजार खड्ड्यांची नोंद झाली आहे़दरवर्षी पावसाळ्यात मुंबईचे रस्ते खड्ड्यात जातात़ यास यंदाचे वर्षही अपवाद नाही़ लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर रस्त्यांची रखडलेली कामे सुरू झाली़ एप्रिल महिन्यातच मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले होते़ मान्सूनने महिन्याभराचा विलंब करून ही कामे उरकून घेण्याची संधीही पालिकेला दिली़ तरीही जुलै महिन्याच्या पंधरवड्यातच मुंबईचे रस्ते खड्ड्यात गेले आहेत़२०११ मध्ये पालिकेने सुरू केलेल्या संकेतस्थळावरून शहराची ही परिस्थिती उघड झाली आहे़ नागरिकांकडून व अभियंत्यांद्वारे आलेल्या खड्ड्यांच्या छायाचित्रांवरून मुंबईत २००५ खड्डे आढळून आले आहेत़ याबाबत प्रशासनाने तातडीची बैठक घेऊन अभियंत्यांना तत्काळ खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत़ मात्र आतापर्यंत शोध लागलेल्या २००५ खड्ड्यांपैकी पाचशे खड्डे अद्याप जैसे थेच आहेत़ (प्रतिनिधी)