Join us
Daily Top 2Weekly Top 5

वसई तालुक्यात पावसाने भातशेतीचे नुकसान

By admin | Updated: October 9, 2014 01:09 IST

मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने वसईतील बहुतांश भातशेतीचे नुकसान झाले.

नायगांव : मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने वसईतील बहुतांश भातशेतीचे नुकसान झाले. नायगांव, गिरीज, सांडोर, चुळणे, गास, भुईगांव, नार्दोली, नाळे या पश्चिम पट्ट्यातील गावांतील भातशेतीचे नुकसान झाले. आॅक्टोबरमध्ये अचानक जोरदार पावसाने भातशेतीच्या नुकसानाच्या घटना घडल्या आहेत. काही भागात भातपिकाच्या कापणीसही सुरूवात झाली होती. मात्र ही कापलेली भाताची कणसेही पावसात भिजल्याने वाया गेली आहेत. तर काही ठिकाणी संपूर्ण भातपिकेच पावसामुळे झोपल्याचेच चित्र दिसत आहे. शासनाने याची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. जून महिना कोरडा गेल्याने या पूर्वीच अनेकांची शेती नष्ट झाली होती. तर बागायती पट्ट्यालाही फटका बसला आहे. भाजी, फळे या बागायतींनाही हा पाऊस नुकसानदायकच ठरला आहे. आता भरपाई मिळणार कशी? हा नेहमीचा प्रश्नही आहेच. शासकीय यंत्रणा सध्या निवडणुकांत व्यस्त आहेत. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणार का असा प्रश्न शेतक-यांना भेडसावत आहे.