Join us

प्राणी संग्रहालयांसाठी ४९ कोटींचे पॅकेज

By admin | Updated: February 5, 2015 02:27 IST

मुंबई शहर आणि उपनगरांतील विविध प्राणी संग्रहालयांच्या विकासकामांसाठी २०१५-१६ सालच्या अर्थसंकल्पात ४९ कोटी तरतूद करण्यात आली आहे.

३ लाख २४ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर उद्याने-क्रीडांगणांचा विकासमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील विविध प्राणी संग्रहालयांच्या विकासकामांसाठी २०१५-१६ सालच्या अर्थसंकल्पात ४९ कोटी तरतूद करण्यात आली आहे. शिवाय महापालिकेच्या कार्याक्षेत्रातील २९ भूखंड विकासाकरिता निश्चित करण्यात आले असून, संकल्पचित्र तयार करा-बांधा या संकल्पनेनुसार प्रत्येक उद्यानाचा थीम उद्यान म्हणून विकास करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या अंतर्गत एकूण ३ लाख २४ हजार चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळावर उद्याने/ क्रीडांगणे विकसित करणार आहेत.राणीच्या बागेच्या आधुनिकीकरणासाठी इंटरप्रिशन सेंटर इमारतीच्या तळमजल्यावर हंबोल्ट पेंग्वीन पक्षी सुविधा तयार करण्यात येत असून, एकूण ६ हंबोल्ट पेंग्वीन पक्षी डिसेंबरअखेरीस प्राणी संग्रहालयात आणण्यात येणार आहेत. आरे मिल्क कॉलनी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय उभारण्याकरिता महाराष्ट्र शासन आणि महापालिकेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. आणि तो शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. पवई उद्यानात जागतिक दर्जाचे पक्षी उद्यान विकसित करण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आला असून, याकरिता मे. युनिव्हर्सल आॅर्गॅनिक यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.३३ भूखंडांच्या विकासाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. २ लाख २३ हजार ६०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाचा उद्याने/क्रीडांगणे म्हणून विकास करण्यात येणार आहे. बोरीवलीमधील चिकूवाडी येथील १२ एकर भूखंडावर बोरीवली क्रीडा संकुल विकसित करण्यात येणार आहे. याकरिता आवश्यक परवानग्या प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा सुरू असून, आवारभिंतीचे काम पूर्ण झाले आहे. शिवाय अंधेरी येथील क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शिवाय उद्याने, मनोरंजन उद्याने, खेळाच्या मैदानांचा विकास याकरिता राखीव असलेल्या १७९ भूखंडांपैकी शहर विभागातील १० भूखंड, पूर्व उपनगरांतील ११ भूखंड आणि पश्चिम उपनगरांतील ४० भूखंड पुढील वर्षी विकसित करण्यात येणार आहेत.२५लाखअंधेरी पश्चिम येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात नाट्यगृह बांधण्यासाठी तरतूद 3.५कोटीअंधेरी आणि मुलुंड संकुलाच्या संरचनात्मक दुरुस्त्यांसाठी ४५कोटीसंग्रहालयाच्या विस्तारासाठी ४० कोटी आणि कॉर्पस फंडासाठी ५ कोटींची तरतूद १०कोटीइंडिया युनायटेड मिल क्रमांक २ आणि ३ संकुलात मुंबईसाठी सांस्कृतिक केंद्रस्थान (कल्चर हब) उभारण्यासाठी तरतूद वृक्षगणना : आजमितीस ११ लाखांपेक्षा अधिक वृक्षांची जीपीएसच्या आधारे गणना करण्यात आली असून, पुढील वर्षी हे काम पूर्ण होईल.नाट्यगृहे आणि जलतरण तलाव : कालिदास नाट्यगृह, बिर्ला क्रीडा केंद्र, कांदिवली जलतरण तलाव आणि चेंबूर जलतरण तलावाचे काम हाती घेण्यात येणार आहे. जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलावाच्या संरचनात्मक दुरुस्त्या, मुलांकरिता स्वतंत्र जलतरण तलाव, प्रेक्षक गॅलरी, प्रशासकीय इमारत, डायविंग बोर्डसह त्यांचे पुनर्बांधकाम करणार आहे.२५लाखमुंबई शहराची संस्कृती समृद्ध करण्यासाठी प्रत्येक वर्षी डिसेंबर, जानेवारी महिन्यात कल्चर फेस्टिव्हलसाठी मंजूर करण्यात आले असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या कामी पुढाकार घेईल.०५कोटीसफर प्रकल्पांतर्गत ७ अतिरिक्त आधुनिक वायू गुणवत्ता संनियंत्रण केंद्राच्या उभारणीसाठी मंजूर झाले असून, इंडियन मेटीओरॉलॉजी डिपार्टमेंटच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेटीओरॉलॉजीच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.०५कोटीचार पाणथळ जमिनींच्या सौंदर्यीकरणाच्या कामापैकी चरई तलावाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, कलिना तलाव, वांद्रे तलाव, बाणगंगा तलाव व शिवाजी या तलावांच्या विकासकामासाठी तरतूद