Join us

वन्य प्रकल्पग्रस्तांना पॅकेजव्यतिरिक्त मोबदला

By admin | Updated: October 15, 2015 02:43 IST

अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, तसेच अन्य वन्य प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांना पुनर्वसन पॅकेज व्यतिरिक्त मोबदला देण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.

मुंबई : अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, तसेच अन्य वन्य प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांना पुनर्वसन पॅकेज व्यतिरिक्त मोबदला देण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, तो राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्पातून नव्याने पुनर्वसित होणाऱ्या गावांना, तसेच पुनर्वसन चालू असलेल्या गावांतील फक्त पुनर्वसनासाठी शिल्लक असलेल्या कुटुंबांना लागू राहणार आहे.‘राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये व व्याघ्र प्रकल्पातील जमिनींचे संपादन, तसेच होणारे स्थलांतर ऐच्छिक असल्याने, त्यास भूसंपादनाचा कायदा लागू होत नाही. मात्र, तरीही पुनर्वसित होणाऱ्या जमिनीचे मूल्यांकन व त्यावरील दिलाशाच्या रकमेचे समावेशन रु. १० लाखांच्या पॅकेजमध्ये न करता, ते अतिरिक्त म्हणून उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे ऐच्छिक पुनर्वसन वेगाने होण्यास मदत होईल,’ असे मुनगंटीवार म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)