Join us  

किराणा दुकांनामध्ये पॅकींग वस्तूचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 6:00 PM

ग्राहकांना, बिस्किटे, नूडल्स मिळेना

मुंबई : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे परंतु त्यामुळे किराणा मालाच्या मागणीत वाढ झाली असून पॅकिंग वस्तूंच्या पुरवठ्यात घट झाली आहे. दुकानांमध्ये बिस्किटे , नूडल्सचा निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे राज्यात सध्या लॉकडाऊन सुरू आहे.तरी दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे त्यामुळे लॉकडाऊन वाढ होऊ शकते असे शक्यता लक्षात घेऊन अनेकजण घरामध्ये जीवनावश्यक वस्तूचा साठा करत आहेत. तर दुसरीकडे वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन बंद आहे. पॅकींग वस्तूंचा सध्या तुटवडा भासत आहे.

याबाबत ग्राहक संतोष शिंदे यांनी सांगितले की,लॉकडाऊन काम नाही. त्यामुळे सर्वजण घरी आहेत. लहान मुलांना बिस्किटे,नूडल्स इतर पॅकिंग पदार्थ खायला आवडतात. पण ते पदार्थ  आता मिळत नाहीत. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर  अनेक नागरिकांनी जास्त वस्तूंची खरेदी केली होती. पण  किराणा दुकानांमध्ये वस्तूंचा साठा कमी झाल्यामुळे. बिस्कीट आणि पॅक वस्तूंवर १ ते २ रुपये एमआरपीपेक्षा जास्त घेतले जात होते. इतकेच नव्हे तर तेल , गहू,ज्वारी यांच्या प्रति किलो ५ ते १०रुपये घेतले जात आहेत. पण आता तर दुकानांमध्ये बिस्किटे,नूडल्स इतर पॅकिंग पदार्थ मिळत नाही. या वस्तूंसाठी ऑनलाईन ऑर्डर करावी लागत आहे.

 

तर दुकानदार  हितेश मिश्रा म्हणाले की, बिस्किटे, नूडल्स यांचा पुरवठा करणारी साखळी असते. कंपनीकडून हा माल वितरकाकडे जातो. वितरकाचे सेल्समन येऊन ऑर्डर नेतात नंतर मालाचा पुरवठा होतो. पण आता लॉकडाऊनमुळे ऑर्डर घेण्यास सेल्समन येत नाही. पूर्ण व्यवस्था विस्कळीत झाली  आहे. परिणामी वस्तूंची टंचाई आहे.  वितरक त्यांच्याकडे साठा असेपर्यंत देत होते. पण आता तर त्यांच्याकडेही साठा नाही.यामुळे बिस्कीट नूडल्स मिळत नाही.

टॅग्स :अन्नकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस