प्रशांत शेडगे, पनवेलसिडको वसाहतीत ठिकठिकाणी भरत असलेल्या आठवडे बाजारात मुंबईचे फेरीवाले वस्तू विक्रीसाठी घेवून येतात. या बाजारात ग्राहक व विक्रे ते प्लास्टिक पिशव्या जागच्या जागीच फेकून देतात. याचा त्रास सिडकोच्या सफाई कामगारांना होत असून या पिशव्या आजूबाजूच्या नाल्यात जावून पडत असल्याने प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत.काही स्थानिक तरुण अशा प्रकारचे बाजार भरवत असून मुंबईहून येणाऱ्या विक्रेत्यांकडून पैसे घेत असल्याचे उघड होत आहे. अशा प्रकारे दररोज एका वसाहतीत त्याचबरोबर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आठवडे बाजार भरवले जात आहेत. या ठिकाणी मुंबईहून कपडे, विविध घरगुती वस्तू, चप्पल यांसारख्या अनेक गोष्टी विक्रीसाठी आणल्या जात आहेत. या सर्व वस्तू प्लास्टिकच्या पिशवीत बंदिस्त असतात. या सर्व पिशव्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या असतात. पिशव्या गोळा करताना सिडको सफाई कामगारांच्या नाकीनऊ येते, शिवाय बाजूला असलेल्या पावसाळी नाल्यात या पिशव्या जावून बसतात. परिणामी, नाले तुंबण्याचे प्रकार पावसाळ्यात होत आहेत. एरव्ही कोणताही कार्यक्रम असो, त्याकरिता परवानगी घेतली की नाही, रहदारीस अडथळा तर निर्माण होणार नाही ना याची पडताळणी केली जाते. मात्र आठवडे बाजाराबाबत स्थानिक गप्प असून विचारणा केली तर सिडकोकडे बोट दाखवत आहेत. ौ
आठवडे बाजारात प्लास्टिक पिशव्यांचा ढीग
By admin | Updated: January 16, 2015 22:39 IST