Join us  

टेम्पोला ‘ओव्हरटेक’ करणे विद्यार्थ्याच्या जीवावर बेतले?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 2:04 AM

‘बालदिना’साठी अवघ्या चार दिवसांपूर्वी नवीन हेल्मेट घेऊन मोटरसायकलवरून कॉलेजला निघालेला केतन घरी परतलाच नाही.

मुंबई : ‘बालदिना’साठी अवघ्या चार दिवसांपूर्वी नवीन हेल्मेट घेऊन मोटरसायकलवरून कॉलेजला निघालेला केतन घरी परतलाच नाही. एका टेम्पोच्या धडकेत चाकाखाली येऊन घडलेल्या अपघातात त्याचा दुर्दैवी अंत झाला. गुरुवारी दुपारी घडलेल्या या प्रकारानंतर कुरार पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली. मात्र, मृत विद्यार्थ्याचे कुटुंबीय या धक्क्यातून सावरलेले नाहीत.केतन वर्मा असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो जोगेश्वरीच्या प्रतापनगरमध्ये राहत असून, बोरीवलीच्या परमानंद महाविद्यालयात ‘फायर सेफ्टी अँड इंजिनीअरिंग’चा कोर्स करत होता. त्याचे वडील राजू वर्मा हे परदेशात कार्यरत असून घरी आई शीला आणि दहा वर्षांचा भाऊ कौशिक असे कुटुंब आहे.गुरुवारी शीला यांना केतनच्या अपघाताबाबत कुरार पोलिसांनीफोन करून कळविले आणित्यांना धक्काच बसला. मोटारसायकल रायडिंगची आवड असणाऱ्या केतनने दोन वर्षांपूर्वीच एक सेकंड हँड दुचाकी विकत घेतली होती.बालदिनाच्या निमित्ताने त्याने नवीन हेल्मेट विकत घेतले होते.मात्र, ते त्याला वाचवू शकलेनाही. केतनने टेम्पोला ओव्हरटेककरण्याचा प्रयत्न केला असावा,त्या दरम्यान हा अपघातघडला, असा संशय तपास अधिकाऱ्यांना असून घटनास्थळीचे सीसीटीव्ही फूटेज पोलीस तपासत आहेत.>नेमके काय घडले?गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास तो कुरारच्या शांताराम तलाव परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोहोचला. या ठिकाणी एका आयसर टेम्पोची त्याला धडक बसली आणि मागच्या चाकाच्या खाली त्याचे डोके आले. हेल्मेटसह त्याचे डोके चिरडून जागीच त्याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवत घरच्यांना या अपघाताबाबत कळविले.>चालकाला अटकअपघातप्रकरणी आम्ही नूर मोहम्मद शेख नामक टेम्पोचालकाला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करत या प्रकरणी चौकशी सुरू आहे, अशी माहिती कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी दिली..हेल्मेटची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची?केतन याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनने अठराशे रुपयांचे हेल्मेट घेतले होते. इतके महागडे हेल्मेट केतनला वाचवू शकले नाही, त्यामुळे हेल्मेटच्या गुणवत्तेबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.