Join us  

मध्य रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 6:40 AM

मध्य रेल्वेवरील सायन ते कुर्ला स्थानकादरम्यान नवीन पादचारी पुलाच्या गर्डरचे काम करण्यासाठी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे.

मुंबई : मध्य रेल्वेवरील सायन ते कुर्ला स्थानकादरम्यान नवीन पादचारी पुलाच्या गर्डरचे काम करण्यासाठी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. २५-२६ जानेवारी रोजी रात्री १ ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे दैनंदिन लोकल फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द व घाटकोपर ते माटुंगा दरम्यान दोन्ही दिशेकडे ब्लॉक असेल. परिणामी रात्री १२.२५ वाजताची सीएसएमटी-कर्जत, रात्री १२.२३ ची ठाणे-सीएसएमटी, पहाटे ४.४८ ची सीएसएमटी-कर्जत, पहाटे ठाणे-सीएसएमटी लोकल रद्द होईल.हार्बर मार्गावरील रात्री १२.१४ ची सीएसएमटी-पनवेल लोकल, पहाटे ४.५२ ची सीएसएमटी-पनवेल लोकल, पहाटे ४.२६ ची पनवेल-सीएसएमटी लोकल रद्द होईल. यासह भुसावळ-सीएसएमटी, साईनगर शिर्डी-सीएसएमटी ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वेमध्य रेल्वेमुंबई