Join us
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ठाणे पोलिसांनी मिळवून दिला २३ कोटींचा मुद्देमाल

By admin | Updated: January 9, 2015 22:58 IST

गेल्या संपूर्ण वर्षभरात ठाणे शहर पोलीसांनी १७१० गुन्हयांमधील १३७७ फिर्यादींना त्यांचा सुमारे २३ कोटी ११ लाखांचा मुद्देमाल मिळवून दिला.

जितेंद्र कालेकर ल्ल ठाणेगेल्या संपूर्ण वर्षभरात ठाणे शहर पोलीसांनी १७१० गुन्हयांमधील १३७७ फिर्यादींना त्यांचा सुमारे २३ कोटी ११ लाखांचा मुद्देमाल मिळवून दिला. यात तीन कोटी ८० हजारांचे सोने आणि १८ कोटी ६३ लाखांच्या वाहनांचा समावेश आहे. गुरुवारी ४७ नागरिकांना २० लाख ८१ हजारांचा मुद्देमाल ठाण्याचे सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या हस्ते अभिहस्तांतरीत करण्यात आला. या सर्व नागरिकांनी पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल समाधान व्यक्त केले.आयुक्तालयातील ३३ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात २०१४ मध्ये सहा हजार १६४ गुन्हे दाखल झाले होते. यातील चोरी,दरोडयासारख्या १७१० गुन्हयांचा छडा पोलीसांनी लावला. उघडकीस आलेल्या गुन्हयांमधील १३७७ फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रीया पूर्ण करुन सुपूर्द करण्यात आला. यात तीन कोटी ८० हजार १४३ रुपयांचे १४ किलो ७५ ग्रॅम वजनाचे सोने, १८ कोटींची ७७३ वाहने तसेच एक कोटी २६ लाख ८६ हजारांची मालमत्ता अभिहस्तांतरीत करण्यात आली.४आयुक्तालयातर्फे गुरुवारी रात्री पोलीस स्कूलच्या मैदानावर एका कार्यक्रमात ४७ फिर्यादींना २० लाख ८१ हजारांचा ऐवज सुपूर्द करण्यात आला. अलिकडेच गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने छडा लावलेल्या १५३ सोनसाखळी चोऱ्यांमधील फिर्यादींचा यात मोठया प्रमाणात समावेश होता.४यातील २४ फिर्यादींना सहा लाख ६४ हजार ३५० रुपयांचे ३६५ ग्रॅम सोने, ९ लाख ५४ हजारांची १५ वाहने, एक संगणक तसेच रोकड व इतर वस्तू अशा तीन लाख ६४ हजारांच्या मुद्देमालाचाही समोवश होता. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त शरद शेलार, शिवाजी बोडखे, प्रतापसिंह पाटणकर आणि उपायुक्त पराग मणेरे आदी उपस्थित होते.