Join us  

लाज वाटत नाही का?; छत्रपती शिवरायांच्या एकेरी उल्लेखाने शिवप्रेमी खवळले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 12:50 PM

कॉमेडियन सौरव घोषविरोधात कारवाई करण्याची मागणी

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विनोदांमुळे स्टँड-अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआविरोधात संतापाची लाट उसळली. नेटिझन्सनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मनसेनं हा मुद्दा लावून धरला. त्यानंतर अग्रिमानं माफी मागितली. यानंतर आता आणखी एका कॉमेडियन विरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. सौरव घोष खाननं छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.'मुंबईतील दोन्ही एअरपोर्टची नावं छत्रपती शिवाजी का? एकाचं नाव शिवाजी आणि दुसऱ्याचं नेपोलियन असतं तर कुणी आपल्या मित्राचं लग्न मिस केलं नसतं ना? दुसरं काहीही नाव ठेवा. एकाचं नाव शिवाजी, दुसऱ्याचं नाव नॉट शिवाजी एअरपोर्ट, तिसऱ्याचं मे बी शिवाजी एअरपोर्ट. तुम्ही तर रेल्वे स्टेशनचं नावही शिवाजी ठेवलं. शिवाजी ग्रेट वॉरियर होते. ते पर्यटनप्रेमी नव्हते,' असं सौरव घोष खाननं एका कॉमेडी सादर करताना म्हटलं आहे. याबद्दल आता संताप व्यक्त होत आहे.'विमानतळाच्या नावांमधील गोंधळ संपवण्यासाठी महाराष्ट्र सरकार इंटरनॅशनल एअरपोर्टचं  नाव महाराजा शिवाजी करणार आहे. एक शिवाजी, दुसरा महाराजा. पॅसेंजर सोडा, कधी कधी पायलटदेखील गोंधळत असतील,' असा शिवरायांचा एकेरी उल्लेख सौरवनं केला आहे. याबद्दल त्याच्यावर आणि कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याआधी अग्रिमा जोशुआनंदेखील कॉमेडी करताना शिवाजी महाराजांवर विनोद केले. याविषयी नेटिझन्सनी संताप व्यक्त केला. अग्रिमा जोशुआने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या असून तिच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी सोशल मीडियात सुरु झाली. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अग्रिमा जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड केली. यानंतर तिने लेखी माफीनामा सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. मनसेचे कार्यकर्ते यश रानडे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विनोदामुळे अग्रिमा जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आल्याचं यात दिसत आहे. तसंच, दुसऱ्या पोस्टमध्ये अग्रिमा जोशुआ हिने याबद्दल लेखी माफी मागितल्याचं सांगण्यात आलं आहे.स्टँडअप कॉमेडियनने केली छत्रपती शिवाजी महाराजांची थट्टा; सोशल मीडियात संतापाची लाटमनसैनिकांनी 'तो' स्टुडिओ फोडला; छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियनने दिला माफीनामा

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराज