Join us  

सत्याच्या लढ्यात विजय आपलाच - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 4:45 AM

  मुंबई महापालिकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महापालिकेत कमी नगरसेवक निवडून आले असले तरी काळजी करू नका, सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्या, पक्ष तुमच्या पूर्ण पाठीशी राहील, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबई महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांशी संवाद साधला.

मुंबई -  मुंबई महापालिकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महापालिकेत कमी नगरसेवक निवडून आले असले तरी काळजी करू नका, सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्या, पक्ष तुमच्या पूर्ण पाठीशी राहील, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबई महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांशी संवाद साधला. सत्याला कोणत्याही परिस्थितीत पराभूत केले जाऊ शकत नाही, त्यामुळे सत्यासाठी लढा व संघर्ष करा, विजय आपलाच होईल, असा कानमंत्र त्यांनी नगरसेवकांना दिला.वांद्रे-कुर्ला संकुलातील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या गेस्ट हाउसमध्ये गांधी यांनी मुंबईतील पक्षाच्या सर्व नगरसेवक व नगरसेविकांसोबत व्यक्तिगत संवाद साधला. या वेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश व इतर पदाधिकारी उपस्थित होते.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या संख्येत पूर्वीपेक्षा घट झाल्याबाबत त्यांनी पदाधिकाºयांना या वेळी जाब विचारला. तसेच नगरसेवकांची संख्या १०० वर नेण्याचे ध्येय्य त्यांनी या वेळी नगरसेवक व पदाधिकाºयांसमोर ठेवले. नगरसेवक तळागाळात कार्य करत असतात व पक्ष आणि सामान्य जनतेमधील दुवा असतात त्यामुळे नगरसेवकांनी पूर्ण ताकदीने सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा व पक्षाला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गांधी यांनी केले.पक्षाच्या विद्यमान नगरसेवकांनी महापालिकेतील सत्ताधाºयांच्या जनहितविरोधी धोरणांना प्राणपणाने विरोध करावा अशी सूचना त्यांनी केली. संसदेत खासदारांची संख्या कमी असली तरी अनेक मुद्द्यांवर काँग्रेसचे खासदार तीव्र विरोध करतात, याकडे त्यांनी नगरसेवकांचे लक्ष वेधले. या वेळी नगरसेवकांनी आपल्या समस्या व सूचना गांधी यांच्यासमोर मांडल्या. गांधी यांनी सुमारे तासभर नगरसेवकांशी संवाद साधला.

टॅग्स :राहुल गांधीमुंबईकाँग्रेस