Join us
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा पुढच्या वर्षी गणेश विसर्जन करण्याच्या सूचना; घरगुती गणेशोत्सवासाठी महापालिकेचे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 06:19 IST

नियम मोडल्यास कारवाई

मुंबई : जागतिक स्तरावर कोरोनाचे थैमान सुरू असताना आता त्याचे सावट यंदाच्या गणेशोत्सवावर दिसून येत आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक आण िघरगुती गणेशोत्सव साजरा करताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत पालिका प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. या नियमाचे उल्लंघन करीत कोरोनाचा फैलाव होण्यास कारणीभूत व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

यावर्षी २२ आॅगस्टपासून गणेशोत्सव साजरा होत आहे. या काळात ११ दिवसांसाठी सार्वजनिक मंडपामध्ये गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येते. तसेच घरोघरीही गणेशमूर्ती आणून त्यांची पूजा केली जाते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिकेने खबरदारी घेतली आहे.

आतापर्यंत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या एक लाख पाच हजारांवर पोहोचली आहे. सध्या २२ हजार सक्रिय रुग्ण आहेत. मात्र गणेशोत्सवाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अवघड ठरेल. यासाठी महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी नियम तयार केले आहेत.

त्यानंतर आता घरगुती गणेशोत्सवासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची व मूर्तीची उंची दोन फुटांपेक्षा अधिक असू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे. शक्य असल्यास यावर्षी पारंपरिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करून आगमन, विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळावे, दर्शनास येणाऱ्या व्यक्तींना मास्क परिधान करण्याचा आग्रह धरावा. तसेच त्यांच्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी, अशी सूचनाही केली आहे.

असे आहेत नियम...

च्भाविकांनी स्थापन केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन पुढेढकलणे शक्य असल्यास या मूर्तीचे विसर्जन माघीगणेशोत्सव किंवा २0२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढीलवर्षीच्या विसर्जनाच्या वेळीही करता येणे शक्य आहे.(त्यासाठी मूर्तीचे पावित्र्य राखण्यासाठी पवित्र वस्त्रात गुंडाळून घरीच मूर्ती जतन करु न ठेवता येईल)च्गणेशमूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास शक्यतो घरच्या घरीअथवा निजकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्तीचे विसर्जन करावे.च्विसर्जनाच्या वेळी पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती असू नये. नैसिर्गक विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी जाणे शक्यतो टाळावे.च्घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक एकित्रतरीत्या काढू नये.च्विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जनप्रसंगी मास्क, शिल्ड इत्यादी स्वसंरक्षणाची साधने वापरावीत.च्शक्यतो लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाऊ नये.च्कोरोना विषाणूचा फैलाव होण्यास कारणीभूत व्यक्ती साथरोग कायदा १८९७ आपत्ती निवारण कायदा २००५ व भारतीय दंड संहिता १८६० कायद्यान्वये कारवाईस पात्र असेल.

टॅग्स :गणेशोत्सवमुंबई महानगरपालिका