Join us

ज्वेलर्सला बोलण्यात गुंतवून लुबाडणाऱ्या आणखी दोघांची ओळख पटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:07 IST

कुरार पोलिसांकडून शोध सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्वेलर्स दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने शिरून मालकाला बोलण्यात गुंतवून ...

कुरार पोलिसांकडून शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ज्वेलर्स दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने शिरून मालकाला बोलण्यात गुंतवून दागिने चोरी करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांची ओळख पटली आहे. कुरार पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

टॅक्सीचालसह आशुतोष जगतनारायण मिश्रा (वय ३३) याच्यासह रेखा हेमराज वाणी (४५), नरेंद्र अशोक साळुंखे (३५), अक्षय हेमराज वाणी (१९), रेणुका शेखर वाणी (२३) आणि शेखर हेमराज वाणी (३४) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. त्यांच्या चौकशीत जोशना कच्छवाई व संदीप गौड ही दोन नावे समोर आली. ज्यांच्यावर छत्तीसगड, तेलंगणा व कर्नाटकमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

आम्ही या दोघांच्या मागावर असून, तांत्रिक तपास सुरू असल्याचे कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बेले यांनी सांगितले. अटक आरोपींकडून ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत, ज्याची किंमत १ लाख ९० हजार आहे. माहिम, नेरूळ, पुणे, सातारा, बीड, रत्नागिरी, कोल्हापूर याठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांंगितले.

..........................