Join us

वरळीत खासगी शिक्षकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

By admin | Updated: July 25, 2014 11:31 IST

अभ्यास न केल्याच्या कारणावरून वरळीत निनाद धोत्रे (9) या तिसरीत शिकणा:या विद्याथ्र्याला खासगी शिकवणीतील शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे.

 मुंबई : अभ्यास न केल्याच्या कारणावरून वरळीत निनाद धोत्रे (9) या तिसरीत शिकणा:या विद्यार्थ्याला खासगी शिकवणीतील शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. यात त्याच्या पाठ, कान, पाय आणि हाताला जखम झाली असून, बेदम मारहाण केल्यावर शिक्षिकेने निनादला दुपार्पयत घरात डांबून ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याचा आरोप मुलाच्या आईने केला असून, या घटनेने घाबरलेल्या संदीपला पालकांनी बदलापूर येथील नातेवाइकांकडे पाठवले आहे.