मुंबई : महिला सरपंचाचे राज्यामध्ये चाललेले प्रयत्न व पुढाकार यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मुंबई विद्यापीठात ३० व ३१ मार्च ‘महिला सरपंच परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्राच्या १० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील महिला सरपंचासोबत त्यांचे संघर्ष व नवीन रणनिती याबाबत संवाद साधण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेत राजकारभारणींबाबतचे भ्रम , कारभारणींचे संघर्ष व रणनिती, सर्वपक्षीय महिला आघाड्यांसोबत संवाद या माध्यमातून साधला जाणार आहे. ही परिषद फिरोजशहा मेहता सभागृहात होणार असून परिषदेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर, माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, कॉमनवेल्थ कार्यक्रम प्रमुख अनुया कुंवर आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगूरु यांची उपस्थिती लाभणार आहे.
महिला सरपंच परिषदेचे आयोजन
By admin | Updated: March 30, 2016 02:38 IST