Join us  

स्वामी गगनगिरी महाराज मनोरी आश्रम येथे  लक्षदीप सोहळ्याचं आयोजन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 10:19 PM

मालाड पश्चिम मनोरी येथील स्वामी गगनगिरी महाराज मनोरी  यांच्या वतीने आज सायंकाळी  लक्षदीप सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते.

मुंबई - मालाड पश्चिम मनोरी येथील स्वामी गगनगिरी महाराज मनोरी  यांच्या वतीने आज सायंकाळी  लक्षदीप सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. विश्वशांती आणि मानव कल्याण हा हेतू डोळ्यासमोर ठेवून गेल्या 18 वर्षापासून या सोहळ्याचं आयोजन केलं जोतं. यामध्ये एकूण 1 लाख 51 हजार दिवे प्रज्वलित करण्यात आलं. यावेळी संपूर्ण आश्रम परिसर दिव्यांनी उजाळून निघाला होता.

 मनोरीतील स्वामी गगनगिरी महाराज आश्रमात दरवर्षी शरद पौर्णिमेच्या मुहूर्तावर दीपोत्सव साजरा करण्यात येतो. त्यानुसार यंदाही स्वामी भक्तांनी विश्वशांतीच्या हेतूने आश्रमात १ लाख ५१ हजार दिवे उजळवले. या दीड लक्ष दीपोत्सवाची नोंद लिम्का बुक आॅफ रेकाॅर्डमध्येही करण्यात आली आहे.या संदर्भात आश्रमचे मुख्य व्यवस्थापक निषाद अमृतराव पाटणकर यांनी सांगितले की, मागील 18 वर्षांपासून आम्ही आश्रमात शरद पौर्णिमेच्या मुहूर्तावर दीपोत्सव सोहळा साजरा करत आहोत. दसऱ्यापासून शरद पौर्णिमेपर्यंत आश्रमात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.यांत प्रामुख्याने भजन-किर्तन, सत्यनारायण पूजा, पालखी मिरवणूक, आरोग्य शिबीर, छप्पन भोग, नवैद्य अर्पण सोहळा, सामुदायिक गुरूसप्तशती परायण, तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेकी इ. खेळांचाही समावेश असतो. शहर आणि उपनगरांतून या सोहळ्यासाठी भक्त आश्रमात उपस्थित राहतात अशी माहिती येथील गगनगिरी महाराज आश्रमाचे मुख्य व्यवस्थापक निषाद अमृतराव पाटणकर यांनी दिली.

टॅग्स :मुंबई