Join us

परळमध्ये उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 02:53 IST

परळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाला लागून असलेल्या परमार गुरुजी मार्गावरील भावसार सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभाग क्रमांक २०३तर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : परळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाला लागून असलेल्या परमार गुरुजी मार्गावरील भावसार सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभाग क्रमांक २०३तर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे निमित्त साधत रविवारी, १५ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेदरम्यान हा मेळावा पार पडेल. ‘लोकमत’ या मेळाव्याचे माध्यम प्रायोजक आहे.रोजगार मेळाव्याचे आयोजक मनसे शाखाध्यक्ष नीलेश इंदप यांनी सांगितले की, या मेळाव्यात बॅक आॅफिस, अकाउंटंट, डिजिटल मार्केटिंग, आयटी इन्फ्रा सर्व्हिसेस, डाटा एन्ट्री, फार्मा, कलेक्शन बॉय, सेल्स व मार्केटिंग, बीपीओ, नेट डेव्हलपर अशा विविध क्षेत्रांतील नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे. इच्छुकांनी छायाचित्र आणि बायोडाटासह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक नीलेश इंदप यांनी केले आहे.