Join us
Daily Top 2Weekly Top 5

टाटाच्या टॉवरला भांडुपवासीयांचा विरोध

By admin | Updated: September 20, 2014 01:16 IST

टाटा कंपनीकडून नव्याने उभारण्यात येणा:या विजेच्या टॉवरला भांडुपच्या रहिवाशांचा विरोध आहे.

मुंबई : टाटा कंपनीकडून नव्याने उभारण्यात येणा:या विजेच्या टॉवरला भांडुपच्या रहिवाशांचा विरोध आहे. टॉवर इमारतीलगत उभारल्यास त्याचा धोका रहिवाशांच्या आरोग्यावर होणार असल्याने या प्रस्तावाला विरोध करीत रहिवाशांनी टाटाच्या अधिका:यांना परिसरात येण्यास मज्जव केला. 
45 वर्षे जुन्या भांडुप उषानगर सोसायटीत 45क् कुटुंबे आहेत. इमारतीच्या बाजूने टाटा पॉवरच्या विद्युत प्रवाह करणा:या 11क् केव्ही व्ॉट क्षमतेच्या विद्युत वाहक तारा गेल्या आहेत. रविवारी येथे पोलीस आयुक्तांकडून आलेल्या पत्रने स्थानिकांची झोपच उडवली. 11क् केव्ही व्ॉटमध्ये वाढ करीत तिथे 22क् केव्ही व्ॉट क्षमतेच्या विद्युत वाहक तारा बसवून इमारतीच्या जागेमध्ये नवीन टाटा टॉवर उभा राहणार असल्याचे ते पत्र होते. मात्र टाटा पॉवरच्या या घुसखोरीला रहिवाशांचा विरोध आहे.
शुक्रवारी सकाळी 1क् वाजल्यापासून टाटा पॉवरचे अधिकारी टॉवर उभारणीच्या कामासाठी फौजफाटा घेऊन इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर हजर झाले होते. मात्र स्थानिकांनी इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या घातल्यामुळे अधिका:यांना ताटकळत राहावे लागले. 
रहिवाशांच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. या वेळी परिमंडळ 7चे डीसीपी डॉ. विनय राठोड यांनी स्थानिकांची समजूत घालून वातावरण  नियंत्रणात आणले. दुपारी साडेतीन वाजता सोसायटीच्या काही सदस्यांनी राकेश मारिया यांची भेट घेत यावर विचारविनिमय करण्यासाठी बैठक घेतली. सायंकाळी उशिरार्पयत ही बैठक सुरू होतीे. शनिवारी सकाळी 9 वाजल्यापासून कामाला सुरुवात केली जाणार असून, कामात अडथळा निर्माण करणा:यांना अटक करू असे पोलिसांनी सांगितले आहे.(प्रतिनिधी)
 
च्याबाबत टाटा पॉवर कंपनीचे जनसंपर्क अधिकारी दिलीप 
चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, उषानगर सोसायटीच्या परिसरात सुरू असलेले 22क् केव्ही व्ॉटचे ट्रॉम्बे सेलसेट लाइनच्या कामासाठी नवीन ट्रान्समिशन टॉवरचा पाया रचण्याचे काम सुरू आहे. 
च्मुळात उत्तर व दक्षिण मुंबई दरम्यान ट्रान्समिशन प्रणाली मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या योजनेचा हा एक भाग आहे. याचे 9क् } काम पूर्ण झाले आहे.