Join us

पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हलविण्यास सेनेचा विरोध

By admin | Updated: November 30, 2014 01:29 IST

पश्चिम रेल्वेचे मुंबईतील मुख्यालय गुजरातेत हलविण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे.

मुंबई : पश्चिम रेल्वेचे मुंबईतील मुख्यालय गुजरातेत हलविण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. या प्रश्नी शिवसेना खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे. 
मुंबईतील महत्त्वाची कार्यालये इतरत्र हलविण्याची कोणतीही गरज नाही. मुंबईला कमकुवत करण्याचा हा डाव असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष्य घालावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे.  
ज्या रिझव्र्ह बँकेमुळे मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते त्याच रिझव्र्ह बँकेचे मुख्यालय गुजरातला हलवण्याचा प्रय}, उरण येथील जेएनपीटी बंदरातील जलवाहतूक गुजरातच्या  कांडला इथे हलवण्याचा प्रकार, मुंबईत येऊन गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबाई पटेल यांनी उद्योगपती व गुंतवणूकदारांना गुजरातमध्ये येण्याचे केलेले आवाहन आणि आता पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हलविण्याची मागणी, हे सारे प्रकार मुंबईच्या अस्तित्वावर पद्धतशीरपणो घाला घालण्याचा डाव असल्याचे राऊत यांनी आपल्या पत्रत म्हटले आहे.
अहमदाबादमधील भाजपा खासदार किरीट सोळंकी यांनी पश्चिम रेल्वेचे मुंबईतील मुख्यालय हलवून गुजरातमधील अहमदाबाद येथे न्यावे, अशी मागणी शुक्रवारी लोकसभेत बोलताना केली. अहमदाबाद हे पश्चिम  रेल्वेसाठी मध्यभागी असल्याने सोईचे आहे, असा दावा त्यांनी केला. मुख्यालयासाठी गुजरात सरकारने जागाही उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या प्रश्नावर गुजरात सरकारने यापूर्वी अनेकदा रेल्वे मंत्रलयाशी पत्रव्यवहार केला आहे, याकडेही सोळंकी यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)