नवी मुंबई : प्रस्तावित ठाणो मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडसाठी जमिनी देण्यास ओवळा गावातील शेतक:यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे यासंदर्भात चर्चा करण्यास पालकमंत्री गणोश नाईक यांनी मंगळवारी मंत्रलयात बोलाविलेल्या बैठकीस उपस्थित न राहण्याचा निर्णय काही शेतक:यांनी घेतला आहे.
वडाळा ते कासार वडवली या प्रस्तावित मेट्रो मार्गाला नुकतीच मंजुरी मिळाली. त्यानुसार एमएमआरडीएने कार्यवाहीसुद्धा सुरू केली आहे. या प्रकल्पाअंतर्गत ठाणो महापालिका कार्यक्षेत्रतील ओवळा गावच्या हद्दीत 20 हेक्टर जागेवर मेट्रो कारशेड उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे येथील आदिवासींच्या शेतजमिनी, बागायत व त्यांची घरे बाधित होणार आहेत. तसेच या क्षेत्रतील सुमारे 1क् ते 15 हजार फळझाडांची कत्तल होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून या प्रकल्पाला विरोध होत आहे. यासंदर्भात ठाणो महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली काही शेतक:यांनी गुरुवारी पालकमंत्री गणोश नाईक यांच्या जनता दरबारात जाऊन आपली कैफियत मांडली. त्यावर नवी मुंबई विमानतळबाधितांना सिडकोने देऊ केलेल्या पुनर्वसन पॅकेजप्रमाणो ठाणो मेट्रोबाधितांनाही लाभ मिळावा, अशी सूचना पालकमंत्री नाईक यांनी या वेळी केली होती. त्याला जगदाळे यांच्यासह उपस्थित काही शेतकरी प्रतिनिधींनी सहमती दर्शविली होती. त्यानुसार या विषयावर चर्चा करण्यास पालकमंत्र्यांनी मंगळवारी मंत्रलयात एक बैठक आयोजित केली आहे.
या संदर्भातील सविस्तर वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र मेट्रोकारशेडमुळे बाधित होणा:या ओवळा गावातील काही शेतक:यांनी या बैठकीला हजर न राहण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात आम्ही कोणत्याही मोबदल्याची मागणी केली नव्हती. त्यामुळे आम्हाला कोणीही कोणत्याही प्रकारची प्रलोभने दाखवू नयेत. जमिनी देण्यास विरोध असून मंगळवारच्या बैठकीला आम्ही कोणीही उपस्थित राहणार नाही, अशा आशयाचे पत्र गावातील काही ग्रामस्थांनी जारी केले आहे.