Join us
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी शिवसेनेला दिल्या दोन जागा बिनविरोध

By admin | Updated: April 7, 2015 05:25 IST

अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रिपाइं सेक्युलर आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी असून रिपाइंच्या वाट्याला गेलेल्या दोन्ही जागांवर शिवसेनेचे दोन

पंकज पाटील, अंबरनाथ अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रिपाइं सेक्युलर आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी असून रिपाइंच्या वाट्याला गेलेल्या दोन्ही जागांवर शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर या दोन्ही जागांवर काँग्रेस आणि भाजपानेही उमेदवारी दिलेली नाही. दोन जागांवर सेना बिनविरोध आल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. अंबरनाथ पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनाविरुद्ध भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि रिपाइं अशी लढत मानली जात आहे. मात्र, शिवसेनेच्या दोन प्रतिष्ठेच्या जागांवर भाजपा, काँगे्रस आणि राष्ट्रवादी-रिपाइं यांनी एकही उमेदवार दिलेला नाही.