मुंबई : कल्याण-डोंबिवली शहर स्मार्ट सिटीच्या रूपाने विकसित होणार असून, इंडस्ट्रीयल कॉरिडोर व ग्रोथ सेंटर सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.स्मार्ट सिटीची पर्वणी पुस्तकाचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, उपाध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, भाजपा प्रभारी सरोज पांडे उपस्थित होते. येत्या काही दिवसांत शहराचा कशाप्रकारे जलद विकास होईल, औद्योगिक विकासासह शहर रोजगारनिर्मितीत कसे अग्रगण्य कसे होईल, नवी मुंबई विमानतळाचा कल्याण-डोंबिवलीला कसा हातभार लागेल याचा तपशील पुस्तिकेत दिलेला आहे. या भागाच्या विकासासाठी अलीकडेच १,०९८ कोटी रुपये मंजूर केल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. (विशेष प्रतिनिधी)
कल्याण-डोंबिवलीत रोजगाराची संधी
By admin | Updated: September 9, 2015 01:04 IST