Join us
Daily Top 2Weekly Top 5

ई निविदा घोटाळ्याबाबत विरोधकांची पोलिसांकडे धाव

By admin | Updated: September 19, 2014 01:53 IST

ई निविदा घोटाळ्याची पालिका प्रशासनामार्फत एकीकडे चौकशी सुरू असताना विरोधकांनी मात्र पोलिसांकडे धाव घेतली आह़े या घोटाळ्याची तक्रार करण्याची तयारी मनसेने सुरू केली आह़े

मुंबई : ई निविदा घोटाळ्याची पालिका प्रशासनामार्फत एकीकडे चौकशी सुरू असताना विरोधकांनी मात्र पोलिसांकडे धाव घेतली आह़े या घोटाळ्याची तक्रार करण्याची तयारी मनसेने सुरू केली आह़े त्याचवेळी राष्ट्रवादीने हे प्रकरण पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या निदर्शनास आणले आह़े 
प्रभागस्तरांवरील नागरी कामांच्या वाटपास आणलेल्या ई निविदा प्रणालीत 1क्क् कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होत आह़े टेस्ट ऑडिट अॅण्ड व्हिजिलन्स ऑफिसरने (टाओ) हा घोटाळा आयुक्त सीताराम कुंटे यांच्या निदर्शनास आणला़ या प्रकरणी उपायुक्त वसंत प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आह़े परंतु माहिती तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी असलेल्या अधिका:याकडे चौकशीची सूत्रे सोपविण्यास विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आह़े या प्रकरणी निष्पक्ष चौकशीसाठी पोलिसांकडेच तक्रार करण्याची मागणी विरोधकांनी केली आह़े पालिकेच्या महासभेत प्रशासनाला जाब विचारण्याचे मनसुबे विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी आखले आहेत़ राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना पत्र लिहून आर्थिक गुन्हे अन्वेषण खात्यामार्फत चौकशीची मागणी केली आह़े तर मनसेही उद्या तक्रार करणार आह़े (प्रतिनिधी)