मुंबई : पोलिसांचे खबरी असल्याचे सांगत ब्लॅकमेल करणारे गुंड व वारंवार होणाऱ्या पोलीस कारवाईविरोधात मुंबईतील बारमालकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश बारमालक आहार या संघटनेचे सदस्य आहेत. अधिकृत परवाने व शासकीय नियमानुसारच बारमालक आपला व्यवसाय करतात. मात्र, खबरी असल्याचे सांगत अनेक गुंड बारमालकांकडे पैशांची मागणी करतात. सध्या कथित खबऱ्यांच्या उपव्यापांनी बारमालक त्रस्त आहेत. तर प्रसिद्धीसाठी पोलिसांच्या सामाजिक शाखेकडून बारमालकांवर छापे टाकण्यात येत असल्याचा आरोप फॅमिली रेस्टॉरन्ट अॅण्ड बार ओनर्स असोसिएशनचे कृष्णा नायक यांनी केला. (प्रतिनिधी)
पोलीस कारवाईला बारमालकांचा विरोध
By admin | Updated: January 16, 2015 03:28 IST