Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा दिवसानिमित्त खुली लेख स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:07 IST

मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय, मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी ...

मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय, मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर जन्मदिन आणि मराठी भाषा दिवस दरवर्षीप्रमाणे काशिनाथ धुरू हॉल, दादर-पश्चिम येथे संध्याकाळी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने दासावाचे प्रमुख कार्यवाह दत्ता कामथे यांच्या स्मरणार्थ ‘डिजिटल युग : मराठी वाचनसंस्कृतीला तारक की मारक’ तर कामगार नेते वसंतराव होशिंग यांच्या स्मरणार्थ ‘माझा मराठीची बोलु कौतुके’ या विषयावर शब्दमर्यादा १२०० असलेली खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली असून आहे. संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी त्यांची घोषणा केली आहे. प्रत्येकी ५ रोख पारितोषिक व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे. युनिकोड फाँटमध्ये टाइप करून १५ फेब्रुवारीपर्यंत लेख पाठवावेत, असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे.