Join us
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे सर्व पर्याय खुले

By admin | Updated: October 19, 2014 02:15 IST

: ‘काँग्रेससोबत जाण्याचा वा इतर पर्यायांचा विचार करण्याची गरजच भासणार नाही. आम्ही स्वबळावर सत्तेत येऊ

मुंबई : ‘काँग्रेससोबत जाण्याचा वा इतर पर्यायांचा विचार करण्याची गरजच भासणार नाही. आम्ही स्वबळावर सत्तेत येऊ, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे सव्रेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक प्रचाराच्या काळात केला होता; पण आता 5क्र्पयत जागा मिळतील, अशी आशा पक्षाचेच नेते व्यक्त करू लागल्याने निकालापूर्वीच राष्ट्रवादीने हार पत्करल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी राज्यातील नव्या सरकारच्या स्थापनेत निर्णायक भूमिकेची आशा राष्ट्रवादीने अद्याप सोडलेली नाही. 
विविध एक्ङिाट पोलमध्ये राष्ट्रवादीला 27 ते 4क् जागा मिळतील, असे म्हटले आहे. पण आम्हाला किमान 5क् जागा मिळतील, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले. तर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीला किमान 6क् जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. मलिक म्हणाले की, ओबीसी मतांची भाजपाने यशस्वी जुळवाजुळव केली. त्याचा त्यांना फायदा होईल. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभाराचा आम्हाला फटका बसेल. राज्यातील मतदारांनी विरोधात बसण्याचाच कौल आम्हाला दिला तर त्यासाठी आमची तयारी असेल. 
 बहुमतासाठी कोण्या एका पक्षाला जागा कमी पडल्यानंतर राष्ट्रवादीचे भाव वाढतील, असे म्हटले जात आहे. राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक असेल एवढेच या पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल सांगत आहेत; पण त्रिशंकू विधानसभेच्या परिस्थितीत भाजपा वा शिवसेनेसोबत जाणार की नाही यावर भाष्य करण्याचे टाळले आहे. छगन भुजबळ यांनी मात्र, राष्ट्रवादी कोणत्याही परिस्थितीत भाजपासोबत जाणार नाही, असे चॅनेल्सना सांगितले. 
त्रिशंकू विधानसभेची स्थिती उद्भवली तर जोडतोडीच्या राजकारणात काँग्रेस राहणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून सरकार बनणार असेल तरच काँग्रेसला सत्ता स्थापनेत रस राहील. काँग्रेसला 75 जागा मिळतील, असा दावा करून प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हरिश रोग्ये शनिवारी म्हणाले की, राष्ट्रवादी म्हणते त्या प्रमाणो त्यांना 6क् जागा मिळाल्या तर राज्यात पुन्हा एकदा आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी निकालाच्या दिवशी मुंबईतच आहेत. त्रिशंकू विधानसभेची परिस्थिती उद्भवली तर ते रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिका:यांच्या निवडणुका सोडल्या तर स्थापनेपासून राष्ट्रवादी पक्षाने कथित जातीयवादी पक्षांशी कधीही आघाडी केलेली नाही. पक्ष धर्मनिरपेक्ष शक्तींसोबतच राहील, असे सांगत राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिली. 
या निवडणुकीत काँग्रेसबरोबरची आघाडी तुटली आहे. या टप्प्यावर राष्ट्रवादी काय भूमिका घेते हे त्रिशंकू विधानसभेच्या स्थितीत महत्त्वाचे ठरू शकते. (विशेष प्रतिनिधी)