Join us  

शिवसेनेतच कार्यकर्त्यांचा राज्यकर्ता होऊ शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 9:22 PM

शिवसेना ही अशी एक संघटना आहे की,शिवसेनेतच कार्यकर्त्यांचा राज्यकर्ता होऊ शकतो असे ठाम प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री व संसदीय कार्यमंत्री अँड.अनिल परब यांनी काल रात्री अंधेरीत केले.

मनोहर कुंभेजकरमुंबई--शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना महाराष्ट्र घडवण्याचा मंत्र दिला.त्यांच्या मंत्राने भारावून पक्षकार्यात स्वतःला झोकून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे विभागप्रमुख व राज्याचे परिवहन व संसदीय कामकाज मंत्री अँड.अनिल परब.शिवसेनाप्रमुखांच्या प्रेरणेने आणि शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभाशीर्वादाने शिवसैनिक ते परिवहन व संसदीय कामकाज मंत्री असा अँड.अनिल परब यांचा प्रवास नेत्रदिपक आहे.त्यामुळे त्यांचा शिवसेना विभाग 4 आणि 5 यांच्यावतीने कृतज्ञतापूर्वक सत्कार सोहळा काल सायंकाळी  अंधेरी पश्चिम शहाजी राजे क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला होता.

शिवसेना ही अशी एक संघटना आहे की,शिवसेनेतच कार्यकर्त्यांचा राज्यकर्ता होऊ शकतो असे ठाम प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री व संसदीय कार्यमंत्री अँड.अनिल परब यांनी काल रात्री अंधेरीत केले. येथील शहाजी राजे क्रीडा संकुलात शिवसेना विभाग क्रमांक 4 आणि 5 यांच्यावतीने त्यांचा सपत्नीक भव्य सत्कार सोहळा 15000 नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला होता,त्यावेळी ते बोलत होते.या सोहळ्यापूर्वी अँड.अनिल परब व त्यांच्या पत्नी अनिता परब यांची सजवलेल्या रथा वरून उभारलेल्या भव्य मंचकापर्यंत मिरवणूक काढली.यावेळी भारावून गेल्याल्या परब यांनी आपली लग्नात देखिल अशी मिरवणूक निघाली नसल्याचे सांगितले.गेली 15 दिवस विभाग क्रमांक 4 आणि 5चे सर्व पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून कार्यक्रम यशस्वी करून दाखवला.

मंत्रीमहोदयांना आशिर्वाद देण्यासाठी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे आवर्जून उपस्थित होते.तर यावेळी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर,मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,उपमहापौर अँड.सुहास वाडकर,आमदार व विभागप्रमुख विलास पोतनीस,आमदार दिलीप लांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

दिवंगत खासदार मधुकर सरपोतदार यांच्या तालमीत तयार झालेल्या अँड.परब यांनी 1998 साली उपविभागप्रमुख व त्यानंतर 2000 साली शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्यावर विभागप्रमुखपदाची जबाबदारी टाकली होती.निवडणूक तंत्रात माहिर असंलेल्या परब यांनी शिवसेनेला निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवून देतांना राज्यात महा आघाडीचे सरकार आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात देखिल भक्कम बाजू मांडली होती.

सत्काराला उत्तर देतांना अँड.अनिल परब म्हणाले की,20 वर्षे विभागप्रमुखपदाच्या कारकीर्दीतील सघर्षमय जीवनपट त्यांनी उलगडला.शिवसैनिकांचे मोठे पाठबळ आणि प्रेम मला मिळाले. शिवसेनेच्या आंदोलनाच्या वेळी शिवसैनिकांनी अंगावर केसेस घेतल्या आणि त्यांच्या बरोबर मी देखिल लॉकअप मध्ये असायचो.तर त्यांची बाजू न्यायालयात मांडत असतांना ते दिवसभर कोर्टाच्या बाहेर असायचे.माझ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर 3 पैकी 2 लोकसभा,तसेच 2002,2007,2012,2017 या चार पालिका निवडणूकांमध्ये तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये मी शिवसेनेला यश मिळवून देऊ शकलो असे त्यांनी सांगितले.माझे कार्यकर्ते  कसे मोठे होतील आणि माझ्या मंत्री पदाचा लाभ राज्याला कसा मिळेल यासाठी आपला प्रयत्न असेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

शिवसेनप्रमुखांचे,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर मनापासून केलेले  प्रेम,दाखवलेला विश्वास, मातोश्रीवर  असलेली दृढ निष्ठा,प्रामाणिकपणा आणि कार्यकर्त्यानी दिलेल्या प्रेमाच्या शिदोरीवर आज एक शिवसैनिक ते राज्याचा परिवहनमंत्री झालो अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.मंत्रीपदी मी असेन,नसेन मात्र माझ्यातील शिवसैनिक हा कायम असेल असे त्यांनी ठामपणे सांगितले.

अँड.अनिल परब यांना शुभाशिर्वाद देतांना  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की,आज माझे वय 98 आहे.दोन दिवसांपूर्वी मी पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो,मात्र आज खास चिरंजीव  अँड.अनिल परब यांना आशिर्वाद देण्यासाठी येथे खास आलो आहे.शिवसेनाप्रमुखांनी  कार्यकर्त्यांशी कसे वागावे याचे बाळकडू देत कार्यकर्ते  आणि माणुसकी घडवण्याचे तब्बल 45 वर्षे काम करत उत्तम राजकारणी निर्माण केले,त्यापैकी आणि चिरंजीव अनिल परब यांच्या सारखे कार्यकर्ते निर्माण झाले असे त्यांनी अभिमानाने सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व साधे होते.1974 साली आम्ही दोघे माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांना वर्षा बंगल्यावर भेटायला गेलो होतो.त्यावेळी दीड तास त्यांची वाट बघत बसलो होतो,अखेर मध्यरात्री आमची व सुधाकर नाईक यांची भेट झाली हा किस्सा त्यांनी सांगितला.आज पुण्यात जागेच्या किती आहे हे आपणाला माहिती आहे असे सांगत, शिवसेनाप्रमुखांनी युती सरकारच्या काळात पुण्यात 21 एकर जागा मला दिली.तिकडे शिवसृष्टी उभारण्याचे काम सुरू असून उदघाटन सोहळ्याला येण्याचे आणि शिवसृष्टी बघायला येण्याचे आमंत्रण बाबासाहेब पुरंदरे  यांनी दिले.

खासदार गजानन कीर्तिकर आपल्या भाषणात म्हणाले की,माझ्या 3 लोकसभा निवडणुकीत अनिल परब यांनी नेतृत्व केले, त्यात 2014 आणि 2019 मध्ये मी मोठया मताधिक्याने विजयी झालो.अनिल परब हे नागरिकांची नाळ ओळखणारा,कार्यकर्त्यांशी हृदयाचे नाते जोडणारा,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा हात असणारे नेते असून मुंबईतील जनतेचे व कार्यकर्त्यांचे लोकनेते आहात असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

महापौर किशोरी पेडणेकर आपल्या भाषणात म्हणाल्या की,कोकणाचा हा भूमिपूत्र  आपल्या कर्तृत्वाने व कार्याने पुढे जाणारे आणि चळवळीतून  मोठे झालेले व्यक्ति मत्व म्हणजे अँड.अनिल परब आहेत.मी पण कोकणाची असून आज मुंबईची महापौर म्हणून त्यांच्या सत्कार सोहळा माझ्या हस्ते होत आहे हे मी माझे भाग्य समजते.

 यावेळी प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत,स्वप्नील बांदोडकर,ऋषीकेश रानडे यांची गाण्यांची मैफिलीचे खास आयोजन करण्यात आले होते.तर भजन सम्राट अनुप जलोटा  उपस्थित होते.या मान्यवरांनी 15000 श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.तर सोलापूरचे प्रसिद्ध नकलाकार प्रो.दिपक देशपांडे यावेळी अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या आवाजात हुबेहूब नकला सादर केल्या.

टॅग्स :अनिल परबशिवसेना