Join us

मतदानात केवळ दीड टक्का वाढ

By admin | Updated: October 16, 2014 22:43 IST

जिल्हय़ातील मतदारांनी जिल्हय़ातील सातही विधानसभा मतदारसंघात आपली जागरूक मतदार ही ओळख सिध्द केली आहे.

जयंत धुळप ल्ल अलिबाग
1952 मधील पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून जागरूक आणि परिवर्तनवादी मतदार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्हय़ातील मतदारांनी जिल्हय़ातील सातही विधानसभा मतदारसंघात आपली जागरूक मतदार ही ओळख सिध्द केली आहे. हा मतदारराजा परिवर्तनवादी आहे किंवा नाही याची स्पष्टता होण्याकरिता आता 19 ऑक्टोबरच्या मतमोजणीच्या निकालाची प्रतीक्षा आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेल, कजर्त, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड या सातही मतदार संघातील मतदान यंत्रे बुधवारी मध्यरात्री अडीच वाजता त्या-त्या विधानसभा मतदार संघातील ‘स्ट्राँगरुम्स’मध्ये सुरक्षित जमा झाली आणि जिल्ह्याची मतदान आकडेवारी अंतिम झाली. त्या आकडेवारीनुसार जिल्ह्याचे अंतिम मतदान 7क्.28 टक्के झाले आहे. 2क्क्9 च्या विधानसभेच्या वेळी जिल्ह्यात 67 टक्के, तर 2क्14 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी 69 टक्के मतदान झाले होते. 
 
उरण विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 77.75 टक्के मतदान
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 77.75 टक्के मतदान 19क्-उरण विधानसभा मतदार संघात झाले आहे. उर्वरित मतदारसंघात 189-पनवेल 66.75 टक्के, 191-पेण 71.48 टक्के, 192-अलिबाग  72.86 टक्के, 193-श्रीवर्धन 67.39 टक्के आणि 194-महाड 67.39 टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण 1क् लाख 17 हजार 973 पुरुष मतदारांपैकी 71.47 टक्के म्हणजे 7 लाख 27 हजार 587 तर 9 लाख 7क् हजार 527 महिला मतदारांपैकी 69.क्2 टक्के म्हणजे 6 लाख 69 हजार 882 महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.