Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी सफाई कामगारांना एकच दिवसाचा ब्रेक

By admin | Updated: December 7, 2014 02:00 IST

महापालिका रुग्णालयात सफाई करण्यासाठी रोजंदारी सफाई कामगार कार्यरत असतात. प्रत्येक चार महिन्यांनी या कामगारांची सेवा चार ते पाच दिवसांसाठी खंडित केली जाते.

मुंबई : महापालिका रुग्णालयात सफाई करण्यासाठी रोजंदारी सफाई कामगार कार्यरत असतात. प्रत्येक चार महिन्यांनी या कामगारांची सेवा चार ते पाच दिवसांसाठी खंडित केली जाते. या वेळी रोजंदारी सफाई कामगारांची सेवा एकाच दिवसासाठी खंडित केली आणि शनिवारपासून कामगारांना कामावर रुजू व्हायला सांगितल्याचे युनियनकडून समजले. 
यंदा मुंबईत डेंग्यू जास्त प्रमाणात पसरला होता. चार ते पाच दिवस या कामगारांची सेवा खंडित केल्यास त्यांच्या जागेवर कोणताही पर्यायी कामगार कामावर येत नाही. पालिकेच्या प्रमुख तीन रुग्णालयांमध्ये सुमारे 3क्क् ते 35क् रोजंदारी सफाई कामगार कार्यरत आहेत. इतक्या कामगारांची सेवा पाच दिवसांसाठी खंडित केल्यास त्याचा परिणाम रुग्णालयाच्या स्वच्छतेवर होतो.