Join us
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वीज ग्राहकांसाठी आॅनलाइन मदत केंद्र

By admin | Updated: April 14, 2016 01:31 IST

राज्यातील उच्चदाब ग्राहक विशेषत: औद्योगिक ग्राहकांच्या विजेच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी वांद्रे येथील महावितरणच्या ‘प्रकाशगड’ या मुख्यालयात आॅनलाईन मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.

मुंबई : राज्यातील उच्चदाब ग्राहक विशेषत: औद्योगिक ग्राहकांच्या विजेच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी वांद्रे येथील महावितरणच्या ‘प्रकाशगड’ या मुख्यालयात आॅनलाईन मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.औद्योगिक ग्राहकांना विनाविलंब वीजजोडणी मिळावी यासाठी केंद्राद्वारे तातडीने सेवा देण्यात येणार आहेत. शिवाय औद्योगिक ग्राहकांच्या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे पाठवून त्या सोडवण्यात येणार आहेत. यासंबंधीची माहिती या केंद्राकडून ग्राहकालाही देण्यात येणार आहे. औद्योगिक ग्राहकांचे वीजबील मुदतीमध्ये भरण्यात आले की नाही, यावरही केंद्राद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.