Join us

अपंग प्रवाशांना आॅनलाइन सवलत

By admin | Updated: July 16, 2015 22:40 IST

प्रवास सवलतीसाठी अपंग प्रवाशांना तिकीट खिडक्यांवर प्रत्यक्षात हजेरी लावावी लागत होती. आता मात्र या कटकटीतून अपंग प्रवाशांची रेल्वे मंत्रालयाने सुटका केली असून, त्यांना

मुंबई : प्रवास सवलतीसाठी अपंग प्रवाशांना तिकीट खिडक्यांवर प्रत्यक्षात हजेरी लावावी लागत होती. आता मात्र या कटकटीतून अपंग प्रवाशांची रेल्वे मंत्रालयाने सुटका केली असून, त्यांना घरबसल्या आॅनलाइन सवलतीचा लाभ घेता येणार आहे.केंद्राकडून ‘डिजिटल इंडिया’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या संकल्पनेचाच आधार घेत रेल्वे अर्थसंकल्प २0१५-१६मध्ये रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आरक्षण खिडक्या, आयआरसीटीसी वेबसाईटमधून फोटो ओळखपत्रामार्फत अपंग प्रवाशांना सवलतीचे तिकीट देण्याच्या सुविधेची घोषणा केली होती. अपंग प्रवासी सवलत प्रमाणपत्र, फोटो ओळखपत्र, जन्मदाखला, निवास स्थानाचे प्रमाण आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो संबंधित रेल्वे कार्यालयाकडे स्वत: देऊ शकतात किंवा पोस्टानेही पाठवू शकतात. रेल्वेकडून अपंग प्रवाशाला फोटो ओळखपत्र देताना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हे ओळखपत्र प्राप्त झाल्यानंतर पुढील पाच वर्षापर्यंत अपंग प्रवासी आॅनलाइन सुविधेद्वारे सवलतीचे तिकीट काढू शकतो, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. फोटो ओळखपत्राचा पाच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर या ओळखपत्राचे नूतनीकरण करावे लागणार आहे.