Join us

जूनच्या पहिल्या आठवड्यात विद्यापीठाचे आॅनलाइन प्रवेश

By admin | Updated: May 30, 2014 01:01 IST

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने गेल्या वर्षीपासून आॅनलाइन नावनोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.

 मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने गेल्या वर्षीपासून आॅनलाइन नावनोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रवेशाचे वेळापत्रक शुक्रवारी विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येणार आहे. आॅनलाइन प्रवेशाचे अर्ज भरून झाल्यानंतर त्याची प्रिंटआऊट घेऊन संबंधित महाविद्यालयात सादर करावी लागणार आहेत. विद्यापीठाने गेल्या वर्षीपासून अशा प्रकारे पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व नावनोंदणी अनिवार्य केली आहे. यंदा सुमारे ४२ अभ्यासक्रमांना प्रवेशपूर्व नोंदणी बंधनकारक केली आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी या प्रक्रियेचा घेतलेला आढावा.