Join us  

सेवा-सुविधांसाठी एक पाऊल पुढे, कंत्राटदारांसह सल्लागारांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 1:44 AM

बावीस किलोमीटर लांबीच्या मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) तीनही टप्प्यांकरिता तीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

मुंबई : बावीस किलोमीटर लांबीच्या मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) तीनही टप्प्यांकरिता तीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पॅकेज-१च्या बांधकामाकरिता(शिवडीकडील बाजू) एलअ‍ॅण्डटी - आयएचआयची नियुक्ती करण्यात आली असून, पॅकेज-२(नवी मुंबईकडील बाजू) देवू - टीपीएल आणि चिर्ले येथे संपणाºया पॅकेज-३साठी एलअ‍ॅण्डटी या कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-४ मार्गिकेचे विस्तृत संकल्पचित्र सल्लागारम्हणून सिस्ट्रा एम.व्ही.ए.ची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग-४वरील वाहतुकीचेजाळे सुधारण्यासह वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी नवाडे फाटा जंक्शन येथे फ्लायओव्हर बांधण्याकरिता टी अ‍ॅण्ड टी इन्फ्राची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या कामामध्ये राष्ट्रीय महामार्ग-४च्या रुंदीकरणाचाही समावेश आहे.वडाळा ट्रक टर्मिनलच्या इमारतीच्या बांधकामाचे आरेखन, सिव्हिल वर्क, डिझाइन डेव्हलपमेंट, बांधकाम कराराची खरेदी, बांधकामादरम्यान देखरेख ठेवणे इत्यादी कामांकरिता फेअरवूड इन्फ्रा अ‍ॅण्ड सर्व्हिसेसची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :मेट्रो