नागोठणे : शहरात मंगळवारी मध्यरात्री चोरांनी १२ ठिकाणी घरफोड्या केल्या. बहुतांशी चोऱ्यांमध्ये महागड्या वस्तूंऐवजी रोकड लंपास केल्याचे उघड झाले आहे. एकाचवेळी झालेल्या या चोऱ्यांमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून चोरीचा मागोवा घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. येथील मुंबई - गोवा महामार्गालगतच्या शांतीनगर भागात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी १२ ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये दोन सदनिका, दोन खासगी कार्यालये आणि आठ दुकानांचा समावेश आहे. सुप्रीम कॉलनीत शैलेश आजगावकर यांचे तसेच संतोष मोकल यांचे फ्लॅटचे कुलुपे तोडून घरात प्रवेश करीत चोरी करण्यात आली. मात्र यात कोणत्या वस्तू आणि किती ऐवज चोरीला गेला याची माहिती पोलीस ठाण्यात उपलब्ध झालेली नाही. तर डॉ. सुनील पाटील यांच्या रुग्णालयालगत असलेल्या बियर शॉपीच्या गल्ल्यातील पाच हजार तसेच शेजारील साई टायर्स दुकानातील सात हजार चोरट्यांनी लंपास केले.
एका रात्रीत १२ घरफोड्या
By admin | Updated: January 14, 2015 23:03 IST