Join us
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणनाट्यातील आणखी एक आरोपी गजाआड

By admin | Updated: June 16, 2015 01:39 IST

बांधकाम व्यावसायिकाच्या पुतण्याचे अपहरण करून तब्बल दोन कोटींची खंडणी उकळणाऱ्या टोळीतील सुरेश पांडे या फरार आरोपीला

मुंबई : बांधकाम व्यावसायिकाच्या पुतण्याचे अपहरण करून तब्बल दोन कोटींची खंडणी उकळणाऱ्या टोळीतील सुरेश पांडे या फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या चेंबूर युनिटने उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातून अटक केली. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी पांडे प्रतापगढ जिल्ह्यात राहत होता. याआधी गुन्हे शाखेच्याच विशेष पथकाने त्याच्या ९ साथीदारांना बेड्या ठोकल्या होत्या. ११ मार्चला विद्याविहारमधून या तरुणाचे या टोळीने अपहरण करून त्याला मुरबाड, वणी येथे तब्बल दीड महिना दडवून ठेवले होते. अपहरण केल्यापासून दीड महिना त्याच्यावर निगराणी ठेवण्यात सुरेशचा सहभाग होता.