Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री एक आणि सह्या दोन

By admin | Updated: June 8, 2015 23:05 IST

राज्यभर राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण सप्ताहाची योग्य अंमलबजावणी करावी, अशा आशयाची दोन पत्रे ग्रामविकास व जलसंधारण आणि रोजगार हमी योजना विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी पाठवली आहेत.

आविष्कार देसाई,  अलिबागराज्यभर राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण सप्ताहाची योग्य अंमलबजावणी करावी, अशा आशयाची दोन पत्रे ग्रामविकास व जलसंधारण आणि रोजगार हमी योजना विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविली आहेत. मात्र या दोन्ही पत्रांवर पंकजा मुंडे यांच्या वेगवेगळ््या सह्या आहेत. त्यामुळे मंत्री एक आणि सह्या दोन अशी परिस्थिती समोर आली आहे.भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी सरकारने ३ ते ९ जून २०१५ या कालावधीत पर्यावरण सप्ताह घोषित केला आहे. याअंतर्गत संपूर्ण राज्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत हाती घ्यावा, असे सरकराने २६ मे २०१५ च्या सरकारी निर्णयात म्हटले आहे. जलयुक्त शिवारासाठी निवडण्यात आलेल्या गावांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. या निर्णयावर महाराष्ट्र राज्याचे अवर सचिवांची सही आहे. जलयुक्त शिवार आणि रोहयोतून याला प्रसिध्दी देण्यात यावी, असाही उल्लेख यात आहे.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणारा पर्यावरण सप्ताह जिल्ह्यात प्रभावीपणे राबविला जावा आणि राज्य दुष्काळ मुक्त व्हावे, यासाठी ग्रामविकास व जलसंधारण आणि रोजगार हमी योजना विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपल्याच लेटरहेडवर पत्रे पाठविली आहेत. त्यामुळे अधिकारी गोंधळले आहेत.सह्या कोणाच्या ?> ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी एक पत्र २६ मे २०१५ रोजी आणि दुसरे पत्र २८ मे २०१५ रोजी पाठविले आहे. मात्र यातील दोन्ही पत्रांवर अनुक्रमे इंग्रजी आणि मराठीतून सही केल्याचे दिसून येते. प्रशासकीय कामकाजात शक्यतो एकच सही वापरली जाते. जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात पहिल्यांदाच ही दोन्ही पत्रे पडली असतील तेव्हा कदाचित तेही चक्रावून गेले असावेत. त्या पत्रांवर नेमक्या कोणाच्या सह्या आहेत हे फक्त पंकजा मुंडेच सांगू शकतील.