Join us
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून एकाची हत्या

By admin | Updated: November 7, 2015 03:51 IST

डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून एका इसमाची हत्या केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री कांदिवलीत घडला. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

मुंबई : डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून एका इसमाची हत्या केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री कांदिवलीत घडला. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.दीपक कदम (३५) असे मृत इसमाचे नाव असून, तो कांदिवली पश्चिमेकडील लालजीपाडा येथील गणेश इमारतीमध्ये राहत होता. कदम यापूर्वी पालिकेत कंत्राटी पद्धतीने मुकादम म्हणून काम करत. हे काम सुटल्यानंतर सध्या कदम वाहनचालक म्हणून काम करीत होते. गुरुवारी रात्री स्थानिक राजकीय नेत्याचा वाढदिवस असल्याने तो त्याच्या अन्य काही मित्रांसोबत दारू पित बसला होता. त्यावेळी काही कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. त्याचा राग मनात ठेऊन या मित्रांनी त्याला लालजीपाडा बसथांब्याजवळ बोलावले आणि त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून त्याची हत्या केली. शुक्रवारी सकाळी या घटनेबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह भगवती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. (प्रतिनिधी)