Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विमानतळावर विमानाच्या पंख्यात अडकून एकाचा मृत्यू

By admin | Updated: December 17, 2015 03:00 IST

विमानाच्या पंख्यात खेचला गेल्याने एअर इंडिया कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री मुंबई विमानतळावर घडली. या विचित्र घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये

मुंबई : विमानाच्या पंख्यात खेचला गेल्याने एअर इंडिया कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री मुंबई विमानतळावर घडली. या विचित्र घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. एआय-६१९ या मुंबईहून हैद्राबादला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या देखभालीसाठी रात्री पावणे नऊच्या सुमारास एक कर्मचारी कार्यरत होता. हा कर्मचारी काम करत असताना या विमानाचा पंखा सुरू होता. पंख्यासमोरच काम करत असताना हा कर्मचारी त्यात खेचला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना एवढी भयानक होती की त्याची ओळख पटविणेही कठीण झाले. या घटनेची एअर इंडिया तसेच डीजीसीएकडून चौकशी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)