Join us  

सिलेंडर स्फोटात एकाचा मृत्यू

By admin | Published: September 02, 2015 3:02 AM

स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरचा स्फोट होऊन उडालेल्या आगीच्या भडक्यात एकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना कांदिवली (पूर्व) पोईसर येथील

मुंबई : स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरचा स्फोट होऊन उडालेल्या आगीच्या भडक्यात एकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना कांदिवली (पूर्व) पोईसर येथील एका झोपडपट्टीत सोमवारी घडली. कृष्णाकांत झा (वय ४५) असे मृताचे नाव आहे. या घटनेत १० जण जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. जखमींवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. एकापाठोपाठ दोन सिलेंडरचा भडका उडाल्याने परिसरात मोठी घबराट निर्माण झाली. पोईसर येथील बिहारी टेकडी हा झोपडपट्टीचा परिसर आहे. या ठिकाणी बहुतांश परप्रांतीय मजूर राहतात. सकाळी झा यांच्या घरातील सिलेंडरचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. ज्वाळा बाजूला असलेल्या सिलेंडरपर्यंत पोहोचल्याने त्याचाही स्फोट झाला. त्यामध्ये कृष्णकांत झा पूर्णपणे होरपळले गेले. शेजाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत आगीत पाच जण भाजले. त्यांना शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. कृष्णकांत पूर्णपणे भाजल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली असून चौकशी सुरू असल्याचे समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप यादव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)