ठाणे : सोलापूरच्या एव्हॉन लाइफसायन्सेस लि. या कंपनीतून १८० किलोच्या इफेड्रीनची गुजरातमार्गे केनियात तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांना हवा असलेला कथित आरोपी सुशिलकुमार असिकन्नन याचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाण्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांच्या न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला. तसेच एव्हॉनचा तत्कालीन संचालक मनोज जैन, व्यवस्थापक राजेंद्र डिमरी, बाबा धोतरे या तिघांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ७ जुलैपर्यंत लांबणीवर पडली आहे.अडीच हजार कोटींच्या इफेड्रीन तस्करी प्रकरणी अटकेत असलेल्या जैनसह तिघांनी जामिनासाठी ठाणे न्यायालयात धाव घेतली आहे. पकडलेला साठा हा दोन हजार कोटींचा नसून पोलिसांनी हा आकडा फुगवलेला आहे. तसेच इफेड्रीनच्या रासायनिक तपासणीतही अमली पदार्थ आढळले नसल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. सुशिल सुब्रह्मण्यम या आणखी एका फरारी आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. (प्रतिनिधी)
इफेड्रीन प्रकरणात एकाचा जामीन फेटाळला
By admin | Updated: July 6, 2016 01:54 IST