Join us
Daily Top 2Weekly Top 5

वन कर्मचा:यांवर खैर तस्करांचा हल्ला

By admin | Updated: September 17, 2014 03:12 IST

तालुक्यातील कंचाड वनक्षेत्रतील अंभई गावाच्या जंगलात तीन वन कर्मचारी गस्त घालत असताना 3क् ते 4क् खैर तस्करांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला.

दोघांची प्रकृती गंभीर : 3क् ते 4क् खैर तस्करांनी केली मारहाण
वाडा : तालुक्यातील कंचाड वनक्षेत्रतील अंभई गावाच्या जंगलात तीन वन कर्मचारी गस्त घालत असताना 3क् ते 4क् खैर तस्करांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. यात हे कर्मचारी गंभीर जखमी झाले. मंगळवारी दुपारी 12.3क्च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे वन कर्मचा:यांत भीतीचे वातावरण आहे. गणोश गावंड (वय 28), धर्मराज म्हस्के (वय 35) अशी प्राणघातक हल्ला झालेल्या वन कर्मचा:यांची नावे असून, त्यांच्यावर वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तीन वन कर्मचारी अंभई गावाच्या जंगलात मंगळवारी दुपारी गस्त घालत होते. जंगलात 3क् ते 4क् इसम खैरांची खुलेआम तोड करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वन कर्मचा:यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, अज्ञात हल्लेखोरांनी दगड, लाठय़ा-काठय़ांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात गणोश गावंड व धर्मराज म्हस्के यांच्या हातापायाला फॅक्चर झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. त्यापैकी एक कर्मचारी सुनील ढेंगळे तिथून निसटल्यामुळे वाचले.