Join us

कचरापेटीत सापडले एक दिवसाचे बाळ

By admin | Updated: January 13, 2017 07:16 IST

कचरापेटीत एक दिवसाचे जिवंत बाळ सापडल्याची घटना अंधेरीत गुरुवारी घडली.

मुंबई : कचरापेटीत एक दिवसाचे जिवंत बाळ सापडल्याची घटना अंधेरीत गुरुवारी घडली. या प्रकरणी डी.एन. नगर पोलिसांनी अनोळखी पालकांवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. अंधेरी पश्चिमेकडील जमात खाना परिसरात एका कचरापेटीजवळ एक तान्हे बाळ स्थानिकांना आढळले. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला उपचारार्थ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे बाळ नुकतेच जन्मलेले असल्याचे डी.एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)