Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत काँग्रेसचा एकदिवसीय मौन सत्याग्रह; काँग्रेस नेत्यांचा सहभाग

By मनोहर कुंभेजकर | Updated: July 12, 2023 18:52 IST

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना खोट्या प्रकरणात अडकवून केंद्र सरकारने त्यांची खासदारकी रद्द केली.

मुंबई-काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना खोट्या प्रकरणात अडकवून केंद्र सरकारने त्यांची खासदारकी रद्द केली. त्या विरोधात ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आणि राहुल गांधींच्या निडर लढाईच्या समर्थनार्थ  मुंबई काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आज मुंबईत एकदिवसीय मौन सत्याग्रहाचे महात्मा गांधी पुतळा, मंत्रालयाच्या बाजूला, नरिमन पॉईंट येथे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व जितेंद्र आव्हाड हे देखील या एकदिवसीय मौन सत्याग्रहाला समर्थन देण्यासाठी भेट दिली. 

या एक दिवसीय मौन सत्याग्रहामध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्षा प्रा वर्षा गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी खासदार संजय निरूपम व भालचंद्र मुणगेकर आणि हुसेन दलवाई, माजी आमदार मधू चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, माजी मंत्री नितीन राऊत, आमदार भाई जगताप व अस्लम शेख आणि अमीन पटेल, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनिशा बागुल, मुंबई व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.