Join us

कबुतरखान्याच्या दुरुस्तीस एक कोटी

By admin | Updated: December 22, 2014 02:40 IST

दादर येथील कबुतरखान्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसा निर्णयच महापालिकेने घेतला आहे. नव्या कबुतरखान्याचा आराखडा तयार

मुंबई : दादर येथील कबुतरखान्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसा निर्णयच महापालिकेने घेतला आहे. नव्या कबुतरखान्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, नव्या कामासाठी एक कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.कबुतरखान्यात कबुतरांचे उन्ह, पावसापासून रक्षण व्हावे म्हणून येथे काचेचे छत बसवले जाणार आहे. यापूर्वी येथील वाहतूक कोंडी सुटावी म्हणून कबुतरखान्याचा आकार कमी करून तो एकमजली करण्याबाबत पालिकेने निर्णय घेतला होता, परंतु याला स्थानिकांनी विरोध दर्शविला. यासंबधीचा प्रस्ताव पडून होता. आता पालिकेने हा प्रस्ताव पुन्हा मांडला आहे. शिवाय येथील वाहतूक कोंडी सुटावी म्हणून दुभाजकाचा आकार कमी करण्याचा पालिका विचार करत आहे. दरम्यान, कबुतरखान्याच्या रेलिंगची दुरुस्ती, कारंज्याची दुरुस्ती, कबुतरखान्यावर काचेचे छत आणि दवाखाना व प्रजननाच्या जागेची दुरुस्तीचा समावेश आहे. (प्रतिनिधी)